दिवसभरात नेमके काय घडले; मिनिट टू मिनिट घडामोडी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

सकाळी 10.51 : विश्‍वासदर्शक ठराव उद्याच (ता. 27) मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. उद्या पाच वाजेपर्यंत हंगामी अध्यक्ष निवडून, सदस्यांचा शपथविधी आणि लगेचच ठराव.

सकाळी 10.51 : विश्‍वासदर्शक ठराव उद्याच (ता. 27) मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. उद्या पाच वाजेपर्यंत हंगामी अध्यक्ष निवडून, सदस्यांचा शपथविधी आणि लगेचच ठराव.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

11.00 : महाविकास आघाडीकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
11.25 : "वर्षा'वर भाजप नेत्यांची बैठक. अजित पवारही बैठकीला उपस्थित
12.25 : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांच्या स्वतंत्रपणे बैठका
12.30 : बाळासाहेब थोरात यांची कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून निवड
1.30 : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक.
2.30 : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
3.30 : संख्याबळ नसल्याने राजीनामा देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
4.41 : फडणवीस यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला.
5.05 : शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्यास सोनिया गांधी यांची मंजुरी
5.15 : भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड.
5.45 : उद्धव ठाकरे हे पुढील मुख्यमंत्री असतील, असे राष्ट्रवादीकडून जाहीर.
5.50 : विधानसभेचे विशेष सत्र बुधवारी (ता. 27) सकाळी आठ वाजता बोलाविल्याचे राज्यपालांचे निवेदन
6.40 : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये जमले.
9.30 : अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे दाखल...

सस्पेंस थ्रिलर नंतरचा महासत्ता अंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra political minute to minute drama