शेतकरी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी उग्र आंदोलनाचा दरेकरांचा इशारा

pravin Darekar
pravin Darekarsakal media
Updated on

मुंबई : पेचात सापडलेल्या शेतकऱ्यांवर (farmers) आणि एसटी कर्मचाऱ्यांवर (st employees) राज्य सरकार (mva government) पुन्हा अन्याय करीत असून शेतकऱ्यांसाठी उग्र आंदोलन (strike) केले जाईल. तर आंदोलनकारी एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीची धमकी देणाऱ्या एमडींच्या कार्यालयास कुलुप लावू, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी दिला आहे.

pravin Darekar
भिवंडीत ३५ लाखांचा गुटखा जप्त

आंदोलन करणारे एसटी कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्याचा इशारा एसटी च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. त्यासंदर्भात दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना वरील इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. पगार वेळेत होत नसल्यामुळे आतापर्यंत सुमारे 28 एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा विषय गंभीर असतानाही एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वरीलप्रमाणे पत्रक काढून, कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. हे अन्यायकारक परिपत्रक मागे घ्यावे, अशा प्रकारे एसटी कर्मचा-यांवर दबाव आणला जात असेल तर एमडींच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

pravin Darekar
वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा; बोईसरमधील घटना

शेतकऱ्यांसाठी आंदोलन करु

शेतक-यांच्या बिलातून जुलमी पध्दतीने वीज थकबाकीची वसुली करण्याचा महावितरणचा निर्णय अन्यायकारक आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने त्यांना बिलामध्ये सूट दिली पाहिजे किंवा वीज बील माफ केले पाहिजे. परंतु उस उत्पादक शेतक-यांच्या वीज बिलाची थकबाकी वसुल करण्याचा साखर आयुक्तांनी काढलेला फतवा अन्यायकारक आहे. शेतक-यांच्या बिलातून थकबाकी कापू नये, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु असा इशाराही दरेकर यांनी दिला.

सरकार वानखेडेंविरुद्ध आहे का ?

समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची तक्रार आल्यास चौकशी करु असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी सांगितले आहे. मात्र जातपाडतळणीच्या इतर प्रलंबित तपासणीसंदर्भात मुंडे यांनी कधीही वक्तव्य केले नव्हते. त्यामुळे नवाब मलिक यांच्या वक्तव्याची री ओढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यामुळे वानखेडे यांच्याविरुध्द सरकारी पक्षाचा काही नियोजनबध्द कार्यक्रम आहे का, अशी शंका येत आहे. सरकारने कोणाचीही चौकशी जरूर करावी, पण अंमली पदार्थविरोधात लढा देणा-या एका कर्तबगार अधिका-याविरोधात असे प्रकार करणे दुर्दैवी आहे, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
Maharashtra Rainfall Alert
Marathi News Esakal
www.esakal.com