esakal | Breaking : भाजप सत्ता स्थापन करणार नाही- चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra political updates bjp does not make Government

राज्यपालांच्या या पत्रावर आज भाजपच्या कोअर समितीकडून चर्चा करून निर्णय घेण्यात आला. भाजपने आज कोअर समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार याबाबतची माहिती माध्यमांना दिली. भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार आहे.

Breaking : भाजप सत्ता स्थापन करणार नाही- चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आम्हांला सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाकड़ून निमंत्रण दिलं, पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा असा टोलाही त्यांनी लगावला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यावर भाजपच्या कोअर समितीकडून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. भाजपने आज कोअर समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला.

भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्री आमचाच हे स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर त्यांच्याजोडीला कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप

दरम्यान, चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात 21 ऑक्‍टोबरला मतदान होऊन 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहेत. तरीही, सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने दावा केला नव्हता. 

काँग्रेस महाराष्ट्राचा शत्रू नाही : संजय राऊत

या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेत 105 आमदारांचे संख्याबळ असलेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पहिल्यांदा विचारणा केली होती. सध्या भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे 145 आमदारांचे संख्याबळ नाही. मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चर्चा बंद होती. त्यामुळे बहुमत नसताना सरकार स्थापन करायचे यावर भाजपचे मत ठाम झाले आहे. 

loading image