esakal | शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप?
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra political development bjp send message to shiv sena about allianceq

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रित केल्यानंतर आज, दुपारी भाजपच्या कोअर कमिटी सदस्यांची मुंबईत बैठक झाली. पण, या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू असताना, भाजपने शिवसेनेला निर्वाणीचा निरोप दिल्याची माहिती आहे. भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदा संदर्भात शिवसेनेला महत्त्वाचा निरोप दिल्याची महिती आहे. 

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच : उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम

भाजपकडून देण्यात आलेल्या निरोपात शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेच्या सर्व हालचालींवर लक्ष असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात समन्वय साधणाऱ्या दिल्लीतील काही मोठ्या नेत्यांच्या मार्फत हा निर्णय देण्यात आला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी स्टेअरिंग घेतले हातात

निर्णयाविनाच संपली भाजप नेत्यांची बैठक
राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रित केल्यानंतर आज, दुपारी भाजपच्या कोअर कमिटी सदस्यांची मुंबईत बैठक झाली. पण, या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. बैठकीनंतर भाजप नेते, सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बैठकीत राज्यात सत्ता स्थापन करण्या संदर्भात चर्चा झाल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सन्माननीय राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. पण, या संदर्भात भाजप नेत्यांची पुन्हा एक बैठक होणार आहे. चार वाजता ही बैठक होईल आणि त्यानंतर राज्यपालांना भेटून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत.' यावेळी मुनगंटीवार यांच्या सोबत आशिष शेलार, गिरीष महाजन, विनोद तावडे हे नेते उपस्थित होते. 

loading image