Anil Deshmukh: अनिल देशमुखांचं शिंदेंना पत्र, काय केलीये मागणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

Anil Deshmukh: अनिल देशमुखांचं शिंदेंना पत्र, काय केलीये मागणी?

Maharashtra Politics Anil Deshmukh Letter to Eknath Shinde : मनी लाँड्रिंग प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मागील महिन्यात जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर येताच देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राची चर्चा रंगली आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखनी मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, मतदारसंघातील मागणीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

  Kanjhawala Case : फरफटत का नेलं? आरोपींनी पोलिसांसमोर केला धक्कादायक खुलासा

काय म्हटलं आहे पत्रात?

काटोल व नरखेड तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्याची मागणी होती. त्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने तत्वत: मंजुरी दिली असून, तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाला पुढील मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता देऊन आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

काटोल व नरखेड तालुक्यातील विशेषतः नरखेड तालुक्यातील जनतेला नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी ये-जा फार त्रासदासक होतं. यामुळे काटोल येथेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी होत होती. 'त्या संदर्भात नरखेड व काटोल तालुका वकील संघाने सुद्धा मागणी केली होती. याला मंजुरी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी वकील संघटनांसोबत चर्चा करुन यावर कसा तोडगा काढता येईल, यासाठी प्रयत्न केले. याला प्राथमिक मान्यता मिळण्यासाठी मुंबई येथील उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.