
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. ती कबर उखडून फेकली पाहिजे असे विधान छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते.
यावर आता मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला असंच वाटतं की, कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले आहे.