

eknath shinde vs devendra fadnavis
esakal
महायुतीतील अंतर्गत तणाव शिगेला पोहोचला असतानाच शिवसेना (उबाठा) चे माजी उपनेते तथा मालेगावचे बडे नेते अद्वय हिरे यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये जोरदार प्रवेश केला. हिरे यांच्या या घरवापसीमुळे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, हिरे यांच्या प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप करीत शिंदे गट संतापला असून, हिरे यांच्या प्रवेशामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.