शिंदे भाजपमधील वाद चव्हाट्यावर? शिंदे गटाने केला 'हा' आरोप: Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: शिंदे भाजपमधील वाद चव्हाट्यावर? शिंदे गटाने केला 'हा' आरोप

राज्याच्या सत्तेवर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपमध्ये असणार वाद चव्हाट्यावर आले आहेत. राजकीय वर्तुळात दोन्ही गटात वाद सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (Maharashtra Politics BJP and Shinde gat clashes Eknath Shinde Devendra Fadnavis)

देवेन भारती यांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.

या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली.

परंतु भाजपने शिंदे गटाशी चर्चा न करता ही नावे निश्चित केली आहेत असा आरोप शिंदे गटाने केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा: ED: राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड; काय आहेत आरोप?

त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परस्पर उमेदवार कसे जाहीर केले? असा प्रश्न विचारला. नाशिकची जागा शिंदे गटासाठी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते.

तीन जागा भाजप आणि दोन शिंदे गट असे सूत्र ठरले असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी उमेदवार परस्पर जाहीर झाले नाही. यासंदर्भात निर्णय जाहीर केला तेव्हा उदय सामंत उपस्थित असल्याचे सांगून फडणवीस यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Breaking News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 3 युवक जागीच ठार

देवेन भारती यांच्या निवडीवर नाराजी मुंबई पोलीस दलात देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले. या निवडीवर पोलीस दलात नाराजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा न करता परस्पर हा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे. यामुळे या निवडीवर एकनाथ शिंदे नाराज आहेत.