
Maharashtra Politics: भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हे एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर माध्यमांत जयकुमार गोरे यांच्याविरोधात चांगलेच वातावरण तापले. अधिवेशानादरम्यान विरोधकांनी सरकारवर टीका केली. अशातच आता जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार तसेच एका युट्यूब चॅनलच्या पत्रकारावर विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव मांडला.