Dasara Melava Teaser : पोस्टरनंतर CM शिंदेंनी शेअर केला दसरा मेळाव्याचा टीझर

maharashtra politics cm eknath shinde share video teaser for dasara melava at bkc ground
maharashtra politics cm eknath shinde share video teaser for dasara melava at bkc ground

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे वेध लागले आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. दोन्ही गटांकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे पोस्टर समोर आले होते आता शिंदेंनी त्यांच्या बीकेसी मैदानावर होणार असलेल्या दसरा मेळाव्याचा टीझर देखील शेअर केला आहे.

maharashtra politics cm eknath shinde share video teaser for dasara melava at bkc ground
Shivsena: रश्मी ठाकरेंनी आरती केली 'त्या' टेंभी नाक्याचं राजकीय महत्व काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टर जारी केला होता. या पोस्टरमधून शिंदे गटानं धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरेंवर आपला हक्क असल्याचं दाखवून दिलं होतं. यासोबतच त्यांनी ५ ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण हे बीकेसी मैदान, मुंबई असंच सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा बीकेसी वरच होणार हे कंन्फर्म झाले आहे.

maharashtra politics cm eknath shinde share video teaser for dasara melava at bkc ground
राज ठाकरेंकडून अमित शाहांचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'मी मनापासून...'

एकनाथ शिंदे गटानं लावलेल्या पोस्टरमध्ये बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा लावून त्यावर ‘आम्ही विचारांचे वारसदार’, ‘हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार’ अशा आशयाचा मजकूर छापण्यात आले होते. तसेच या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आले आहेत. त्यावर बाळासाहेब तुमचा वाघ आहे, म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असं म्हटलं होतं. दरम्यान व्हिडिओ टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील २० सेकंदाचा हा टीझर असून यामध्ये शिवेसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा धडणार असे लिहिलेले आहे. तसेच यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वापरण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com