फडणवीस पुन्हा सत्तेच्या ‘पीच’वर | Devendra Fadnavis News Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis News Updates

फडणवीस पुन्हा सत्तेच्या ‘पीच’वर

मुंबई : शिवसेनेतील बंडातून राजकीय भूकंप घडवून आणत कुरघोडीच्या राजकारणात आजघडीला सरस ठरलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ४८ तासांत राजकीय भाष्य टाळले. पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विटही काढून टाकण्यास फडणवीस यांनी भाग पाडले. अर्थात, फडणवीस यांचे हे मौन बोलके ठरण्याची चिन्हे असून, त्याच घडामोडींमधून फडणवीस हे पुढील काही तासांतच राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची खेळी करणार असल्याचे स्पष्ट आहे.(Devendra Fadnavis News Updates)

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा पत्त्याचा बंगला हलवून विधान परिषदेनंतर तो कोसळणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्याचे हे सूचक विधान शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून खरे झाले. शिंदे आणि त्यांची साथ देणाऱ्या तीन डझन आमदारांना सुरत व त्यानंतर गुवाहटीत हलवून सत्तेच्या नव्या बंगल्याचा पाया फडणवीस यांनी मजबूत करून ठेवला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे सरकार गडगडणार असल्याचे गृहीत धरून विरोधी बाकावरील भारतीय जनता पक्षाने थेट सरकार स्थापनेच्या हालचाली वाढवून, नवी रणनीती आखली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सामावून घेण्यापासून नव्या सरकारचा शपथविधी, मंत्रिमंडळाचे स्वरूप, ते चालविण्याचे सूत्र, नव्या सरकारमधील वाटाघाटी आदी मुद्यांवर भाजप नेत्यांमध्ये अंतिम चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

भविष्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांसोब फडणवीस यांनी बैठका घेतला. ‘सागर’ बंगल्यावर बसून सूत्रे हलविणाऱ्या फडणवीस यांची भेट घेऊन भाजपच्या अनेक नेत्यांना त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या. परिणामी, भाजपच्या गोटात आतापासूनच उत्सवाला प्रारंभ झाल्याचे दिसत आहेत.फडणवीस हे सकाळपासून ‘सागर’ या बंगल्यावर होते. तेव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांच्यासह काही आमदारांची त्यांची भेट घेतली.

फडणवीसांचा धडका

 • गुवाहाटीतील हॉटेलमधील घडामोडींवर लक्ष

 • आमदारांच्या व्यवस्थेत कुठे कमतरता राहणार नाही, याची काळजी

 • कुंभोज यांच्यासह मर्जीतील काही नेतेही गुहावटीत तैनात

वरिष्ठ पातळीवरून...

 • बंडखोर आमदार सुरतमध्ये असल्यापासून ते गुवाहाटी पोहोचल्यानंतरही दिल्लीतील भाजप नेत्यांचे लक्ष

 • आमदारांना सुरक्षितपणे आसाममध्ये नेण्यापासून तिथे काही धोका होणार नाही आणि पुन्हा फाटाफूट होणार नाही, यावर बारकाईने नजर ठेवण्याची व्यवस्था

 • शिंदे यांनी दुपारनंतर थेट कायदेशीर लढाईची तयारी दाखविली. यातून या आमदारांवर दिल्लीतील यंत्रणेचा कब्जा असल्याचे दिसत होते

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर

 • शिवसेनेचे आमदार गुवाहाटी दाखल

 • शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू विमानतळावर उपस्थित

 • एकनाथ शिंदेंनी नवा गट तयार केल्याची चर्चा

 • शिंदेंनी शिवसेनेचे पाच मंत्री फोडल्याची चर्चा

 • राज्यपाल कोश्यारींना कोरोना

 • झिरवळ - अजित पवार यांची भेट

 • राष्ट्रवादीत खलबतांना वेग, शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक

 • ज्योतिरादित्य शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

 • देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यांवर भाजपची खलबते

 • मंत्री गुलाबराव देखील ‘नॉट रिचेबल’

 • सांगलीमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

 • शिवसेना आमदारांची अजय चौधरींशी चर्चा

 • ठाकरेंचा फेसबुक लाइव्हद्वारे संवाद

 • खासदार गवळींचे ठाकरेंना पत्र

 • शरद पवार -ठाकरेंमध्ये चर्चा

 • राष्ट्रवादीच्या आमदारांची आज (ता.२३) बैठक

Web Title: Maharashtra Politics Devendra Fadanvis Did Not Gave Any Political Speech Establishment Of Power Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top