Maharashtra Politics: बारामतीच्या 'त्या' बैठकीत नेमकं घडलं तरी काय? पडळकरांनी केला खुलासा

भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामतीत झालेल्या बैठकीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsesakal

भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामतीत झालेल्या बैठकीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, असा गौप्यस्फोट पडळकर यांनी केला आहे.

खानापूर तालुक्यातील मोही याठिकाणी आयोजित कार्यक्रमात पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात २०२४ मध्ये भाजपचा उमेदवार असेल आणि तो उमेदवार आपण स्वतः असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहिर केले.

Maharashtra Politics
Education : पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद - दीपक केसरकर

काय म्हणाले पडळकर?

कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याबाबतीत खुलासा केला आहे. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे केवळ अनिल बाबर आमदार झाले. त्यावेळी आपण बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत होतो. आणि बारामती क्लब हाऊसला आपल्याला भेटायला अनिल बाबर आणि त्यांचे जेष्ठ पुत्र अमोल बाबर हे भेटायला आले होते. आणि त्यांनी मला शब्द दिला आमची ही शेवटची निवडणूक आहे, असे आमदार पडळकर म्हणाले.

अनिल भाऊंचे वयही देखील झाले आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही आम्हाला मदत करा. २०२४ मध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असा शब्द अनिल भाऊंनी दिला होता. त्यामुळे २०२४ ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता आणि वरिष्ठ लोक याची नक्कीच दखल घेतील.

Maharashtra Politics
Winter Session : नागपूर अधिवेशनात विदर्भाकडेच दुर्लक्ष

आतापर्यंत ही गोष्टी आपण सांगितली नाही. कारण ते या गोष्टी सांगतील असे वाटले होते. पण ते सांगायला तयार नाहीत. यामुळे आपण मतदारसंघातील लोकांना बैठकीत काय झालं, हे सांगायला पाहिजे म्हणून सांगितले आहे. असही पडळकर यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com