चाणक्याला चंद्रगुप्त शोधावाच लागतो - देवेंद्र फडणवीस

राजकीय उलथापालथीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य
Maharashtra Politics Devendra Fadnavis statement on political affairs Chanakya has to find Chandragupta mumbai
Maharashtra Politics Devendra Fadnavis statement on political affairs Chanakya has to find Chandragupta mumbaie sakal

मुंबई : ‘‘मी कुणाला उपमा देत नाही, पण जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा कोणाला तरी चाणक्य बनून चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ती व्यवस्था उद्ध्वस्त करावी लागते, ’’ असे भाष्य करत काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरील मौन सोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकीय उलथापालथीचे आपणच चाणक्य असल्याचे सूतोवाच केले.

विधानसभेत सोमवारी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर फडणवीस हे बोलत होते. शिवसेनेत झालेल्या बंडाळीचे जोरदार समर्थन करत शिंदे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी, नेत्यांच्या उपलब्धतेचा अनुशेष महाराष्ट्रात निर्माण झाला होता, ती कसर आता भरून निघेल असा टोला त्यांनी ठाकरेंना आणि शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

टिंगल करणाऱ्यांना माफ केले

‘‘ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे महाराष्ट्राचे राजकारण वेगळे आहे. कुणी किती मोठे विरोधक असले तरी आपण एकमेकांकडे जातो. हे राजकारण असेच असले पाहिजे. सत्तेचा अहंकार डोक्यात जाऊन उपयोग नसतो. मध्यंतरीच्या काळात अनेक दुर्दैवी घटना महाराष्ट्राने अनुभवल्या. मी नशीबवान आहे की माझे मुंबईत घर नाही. त्यामुळे माझे घर तुटले नाही आणि सरकारविरुद्ध आवाज उठवू शकलो, असे टोलेदेखील फडणवीस यांनी हाणले.

सत्ता उलथवण्याचे स्पष्टीकरण

सत्ता हे आमच्यासाठी केवळ साधन आहे. आमची खंत एकच होती, की जनादेश मिळूनही एक विचित्र आघाडी जन्माला घातली गेली. जनतेचा अपमान केला गेला त्यामुळेच हे सरकार अशा पद्धतीने उलथवण्यात आल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

  • एकनाथ शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले.

  • वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हा निर्धार मोलाचा आहे.

  • नंदुरबारहून मोर्चा निघाला तर त्यावेळी आमच्या इतर नेत्यांसोबत एकनाथ शिंदे मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी धावले

  • शिंदे यांनी सीमाप्रश्नावर आंदोलन केले. त्यामुळे ४० दिवस ते बेलारीच्या तुरुंगात होते. त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा दबदबा तयार झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com