
धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे, दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नामदेव शास्त्री यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मुंडेंची दुसरी बाजू जाणून घेण्याची विनंती केली आहे. दमानिया यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, त्यांनी पवित्र भगवानगडावरुन अशी पत्रकार परिषद घेऊन भूमिका घ्यायला नको होती, कदाचित त्यांना राजकारण हे वेगळे असते हे माहित नसावं पण मी त्यांना कागदपत्रे दिली तर नक्कीच ते आपली चूक मान्य करतील.