शिंदे फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार? शपथविधी गोंधळाची धक्कादायक माहिती उघड: Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: शिंदे फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार? शपथविधी गोंधळाची धक्कादायक माहिती उघड

राज्यात जून महिन्यात मोठी राजकीय उलतापालाथ पाहायाल मिळाली. शिवसेना कट्टर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत भाजपसोबत नवी सत्ता स्थापन केली. त्यानंतर ठाकरे गटाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. अजूनही सत्तासंघर्षाबाबत प्रश्न निकाली लागलेला नाही. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी असंविधानिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Maharashtra Politics Eknath Shinde and Fadnavis swearing in unconstitutional)

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा धक्कादायक खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

राष्ट्रवादी नेते महेश तपासे यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेच्या संदर्भातील कोणतेही निमंत्रण अथवा अधिकाराचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेले नव्हते, अशी माहिती माहितीच्या अधिकारांमध्ये समोर आली आहे.

या माहितीनंतर विधीमंडळाने अशा प्रकारचे सरकार कसं स्थापन करुन घेतलं? संविधानिक अस्तित्व काय आहे? याचा खुलासा कोश्यारी यांनी करावा. अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

हेही वाचा: Ramdas Athawale : आठवलेंची नाराजी उघड; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात पहिल्यांदाच केलं भाष्य, काय म्हणाले मंत्री?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले. शिवसेनेतील अनेक आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यानंतर ठाकरे गटाने या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणावर घटनापीठात सुनावणी सुरू आहे.