Shivbhojan Thali: राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता; चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics eknath shinde led maharashtra government may be close Shivbhojan Thali

Shivbhojan Thali: राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता; चर्चेला उधाण

महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होण्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics eknath shinde led maharashtra government may be close Shivbhojan Thali)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णया बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, आता राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंदी वर चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यावर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.