Maharashtra Politics: पुन्हा तारीख पे तारीख; सत्तासंघर्षाची सर्वोच्च सुनावणी पुढे ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena
पुन्हा तारीख पे तारीख; सत्तासंघर्षाची सर्वोच्च सुनावणी पुढे ढकलली

पुन्हा तारीख पे तारीख; सत्तासंघर्षाची सर्वोच्च सुनावणी पुढे ढकलली

राज्यातल्या सत्तासंघर्षाची लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई दिवसेंदिवस काही ना काही कारणाने पुढे ढकलली जात होती. अखेर आज कोर्टात पुन्हा एकदा या सुनावणीला पुढची तारीख देण्यात आली आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे ह्या वादाचा पुढचा अंक, अर्थात सर्वोच्च न्यायालयातली पुढची सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे. ही सुनावणी २० दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरेंच्यात आणखी अनिश्चितता निर्माण झाल्याचं दिसत आहे.

आम्ही २७ सप्टेंबरपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं. याच दिवशी निवडणूक आयोगाबद्दलचे सर्वांचे युक्तिवादही ऐकून घेतले जातील, तसंच त्यावर सविस्तर सुनावणी होईल. त्यावर उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी हे चुकीचं असल्याचा दावा केला आहे. ज्यांना विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळालं की, सगळा कारभार व्यर्थ ठरेल, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. तर आमदार असो, वा नसो, पक्षावर दावा करुच शकतो, असं शिंदेंचे वकील नीरज कौल यांच्याकडून सांगण्यात आलं.

Web Title: Maharashtra Politics Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Case Postponed On 27 September

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra Politics