
थोडक्यात
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनात मारहाण झाली, ज्यामुळे सुरक्षा आणि प्रवेश पत्रिकांबाबत प्रश्न उपस्थित झाले.
आव्हाड यांनी आरोप केला की पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकर यांच्या समर्थकांना सोडले आणि त्यांच्या कार्यकर्ता नितीन देशमुख याला अटक केली.
आव्हाड यांनी पोलिस निरीक्षक चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी केली आणि प्रशासनाच्या पक्षपाती कारवाईविरोधात रात्री ठिय्या आंदोलन केले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधानभवनामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीवरुन वातावरण तापलेलं असतानाच विधानभवनामध्ये मध्यरात्रीनंतरही अटकेवरुन चांगलाच राडा झाला. जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी काल रात्री अटक केली.