Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, आता राष्ट्रवादीने ठोकला दावा

Maharashtra Politics
Maharashtra Politics
Updated on

Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून चर्चेचा विषय असलेल्या 12 राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली. त्यामुळे आता पुन्हा 12 आमदारांच्या नावावरुन चर्चा होणार आहे. अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावर भाष्य केले आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीत राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला. 12 विधान परिषद आमदारांच्या यादीत आमचीही हिस्सेदारी असणार. इथून पुढे ज्या-ज्या गोष्टी घडतील त्यावर आमचा अधिकार असणार, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी या यादीला हिरवा कंदील दिला नाही किंवा यादीच्या मंजुरीबाबत भाष्य केले नाही.

Maharashtra Politics
Baramati : पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग! अजित पवारांच्या मदतीने बारामतीत 'अमेठी पॅटर्न'?

याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करूनही राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊनही 12 आमदारांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आव्हान दिले होते. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने दिलेली 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर शिंदे सरकारच्या वतीने नवीन यादी देण्याची तयारी सुरू झाली. या 12 नावांबाबत दोन्ही बाजूंकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता अजित पवार गटाने देखील यात वाटा मागितला आहे.

Maharashtra Politics
Ajit Pawar In Delhi: अजित पवार अर्थ खात्यासाठी आग्रही? प्रफुल पटेल स्पष्टच बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Ajit Pawar
Salim Sarang
Marathi News Esakal
www.esakal.com