

Mahayuti
esakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या प्रचारसभांमधून आणि नेत्यांच्या वक्तव्यांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, हे तिन्ही पक्ष राज्यात केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत; विचारधारेच्या पातळीवर त्यांचे ऐक्य कधीच नव्हते. त्यामुळे निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष होणार का, अशी चर्चा रंगली आहे.