
मुंबई : ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून शेतकऱ्यांविषयीची सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत आणि विविध भ्रष्टाचारांमध्ये मंत्र्यांचा सहभाग असल्याचा निषेध करत विरोधकांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला.