
संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये झालेली अचानक भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं की, “राजकारणात कोणीही कुणालाही भेटू शकतो. यात गैर काहीच नाही. पण शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, यात शंका नाही.”