
इगतपुरी : ‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी तातडीने सुरू करावी, असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इगतपुरी येथे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात मंगळवारी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीबाबत कोणीही सार्वजनिकरित्या वक्तव्य करू नये.