
भाजपचे नेते राम शिंदे यांची गुरुवारी विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड झाली. कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. राम शिंदे यांची निवड होताच रोहित पवारांनी राम शिंदेंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे.