बाळासाहेबांच्या नावाचा सर्वांनाच अधिकार - संभाजीराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje

बाळासाहेबांच्या नावाचा सर्वांनाच अधिकार - संभाजीराजे

बीड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लोकनेते होते. त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार असल्याचे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. राज्यातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे या स्थितीवर लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षाही त्यांनी आज व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न वापरता बंडखोरांनी जगून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर संभाजीराजेंनी हे मत व्यक्त केले. सरकार कुणीही स्थापन करावे, पण शेतकरी आणि सामान्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवावेत. राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच यंदा अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणी रखडली आहे.

राजकीय अस्थिरतेत शेतकऱ्यांची दखल घेतली गेली नाही तर ते आत्महत्या करील. कृषिमंत्री गुवाहाटीमध्ये जाऊन बसलेत, असे सांगण्यापेक्षा उपाययोजना करा. राज्यात कुठले सरकार येईल आणि कुठले जाईल, याच्याशी आम्हाला आणि शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारीसाठी पक्षात येण्याचे निमंत्रण संभाजीराजेंना दिले होते.

हातात चटणी भाकरी

संभाजीराजेंच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान तलवाडा (ता. गेवराई) येथे एका शेतात पेरणीचे काम सुरू होते. चिखल तुडवीत ते शेतात गेले. चाढ्यावर मूठ धरुन पेरणी अनुभवली. परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कापडात गुंडाळलेली भाकरी- चटणी काढून शेतकऱ्यांनी संभाजीराजेंच्या हाती दिली. त्यांनीही प्रेमाचे चार घास खाल्ले. बाजूलाच असलेल्या शेतकऱ्याच्या लहान मुलाला त्यांनी प्रेमाने घास भरविले.

Web Title: Maharashtra Politics Sambhaji Raje Statement Everyone Can Use Balasaheb Thackeray Name Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..