
Sanjay Raut : राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; फडणवीसांना कागदपत्रं दाखवली
खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल सांगितलं आहे. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणीही केली आहे.
संजय राऊत यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले, "भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लाँडरिंग व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे."
संचालक मंडळाबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणतात, "आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे.. Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीस सरकारी पाठींबा आहे का? कारवाई करा!"
या कारखान्याचे चेअरमन भाजपा आमदार राहुल कुल आहेत. संजय राऊत यांच्याबद्दलच्या हक्कभंग समितीमध्ये राहुल कुल यांचाही समावेश आहे.