

Maharashtra Politics
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या एक किंवा दोन महिन्यांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले नव्हते, पण सध्याच्या युतीतील परिस्थिती पाहता असे होऊ शकते, असे आंबेडकर यांनी सांगितले.