Winter Session Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर फडणवीसांच अजब उत्तर; सभागृहात एकच हास्यकल्लोळ

प्रश्नोत्तराच्या तासाला शिंदे गैरहजर राहिले अन्...
Winter Season
Winter Seasonesakal
Updated on

हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. सीमाप्रश्नाचा वाद सुरु आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल गंभीर आरोप करण्यात आले. अशातच आजच्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला शिंदे गैरहजर राहिल्याने विरोधकांना ऐत कुळीत मिळालं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर फडणवीसांनी अजब उत्तर दिले. ज्यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

नेमकं सभगृहात घडलं तरी काय?

विधानसभेच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. उल्हासनगरच्या पाणीप्रश्नावरुन आमदारांनी सरकारला काही सवाल केले. मात्र सरकारकडून अपेक्षित उत्तर न आल्याने अजित पवार आक्रमक झाले. तसेच, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपस्थित नाहीयेत, असा आक्षेप अजित पवार घेतल्यानंतर फडणवीस उत्तर द्यायला उभे राहिले. तुम्ही सभागृह चालू देणार आहेत हे आम्हाला माहिती नव्हते, नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले असते. असा खोचक टोमणा मारला.

Winter Season
Shivsena News: शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? आणखी एक नेता...

फडणवीसांच्या या उत्तरावर अजित पवारांनी उत्तर दिलं. सभागृह चालू देणार नाही हे तुम्हाला माहिती होतं, मग तुम्ही कसे आलात? असा प्रतिप्रश्न अजितदादांनी केला. ज्यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nashik Rabi Season Update
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Eknath Shinde Chief Minister Maharashtra Politics
Sugarcane Crushing in Maharashtra to Start October 15 2026 27 Season Date Announced by State Government
Marathi News Esakal
www.esakal.com