
मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले आहे, मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहणार आहे त्यामुळे मच्छीमारांना आणि स्थानिक नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.