Professor recruitment deadlock ends in Maharashtra as universities adopt the 60+40 selection formula,
sakal
नागपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयातील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा गुंता अखेर सुटला आहे. राज्यपाल आणि कुलपतींनी यापूर्वीच्या ‘८०+२०’च्या गुणाच्या सूत्राऐवजी ‘६०+४०’ गुणांच्या नव्या सूत्राला मान्यता दिली असून त्यामुळे राज्यात रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. महाविद्यालयस्तरावर वरिष्ठ प्राध्यापक पदांच्या पाच हजार ११२ जागांना वित्त विभागाने मान्यता दिल्याने राज्यात मोठी भरती होणार आहे.