
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत. यासाठी राज्याचं शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालंय. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ रवाना झालं असून त्यांना मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेत किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.