Maharashtra: वारसा संवर्धनासोबत स्वच्छताही महत्त्वाची! संरक्षित स्मारकांजवळ शौचालयांना मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

खुलताबाद येथील दर्ग्याजवळ शौचालय बांधण्यास पुरातत्त्व विभागाने घातलेली बंदी उच्च न्यायालयाने केली रद्द; स्वच्छता आणि वारसा संवर्धन या दोन्ही गोष्टींसाठी मूलभूत सुविधांची गरज असल्याचे न्यायालयाचे मत
Mumbai High Court Approves Toilets Near Protected Monuments in Maharashtra, Balancing Heritage and Public Hygiene

Mumbai High Court Approves Toilets Near Protected Monuments in Maharashtra, Balancing Heritage and Public Hygiene

esakal

Updated on: 

खुलताबाद येथील दर्गा हजरत सय्यद शाह राजू खत्ताल हुसेनी येथे दरवर्षी उर्स उत्सवासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक येतात. मात्र, परिसरात पुरेशा स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती.

ही समस्या लक्षात घेऊन खुलताबाद नगरपरिषदेने दर्ग्याच्या हद्दीपासून दूर, मात्र संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरू केले होते. स्वच्छ भारत अभियान आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

Loading content, please wait...