Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Stormy Weather Alert Across Maharashtra as IMD Warns of Heavy Rain, Thunderstorms and Hail in 31 Districts : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; ३१ जिल्ह्यांना अलर्ट, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
maharashtra rain update

maharashtra rain update

esakal

Updated on

महाराष्ट्रावर २४ तासांचा धोक्याचा काळ सुरू झाला आहे. राज्यात तुफानी वादळी पावसाचे संकट घोंघावत असून, एकूण ३१ जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कालपासूनच वादळी पावसाला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी गारपिटीनेही शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्रास दिला आहे. आज ३१ मार्च रोजी या भागांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता अधिक असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता ‘येलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com