

Cyclone Murasu Effect on Maharashtra Weather
esakal
Rain and Thunderstorm Forecast for Konkan and Marathwada : बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळापाठोपाठ आता ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. या वादळी प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज, सोमवार (२ नोव्हेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. दुसरीकडे, उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा