Maharashtra Rain Alert : दिलासादायक ! राज्यात पाऊस परतणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात धो धो कोसळणार, १० जिल्ह्यांना येलो अलर्ट

IMD Yellow Alert : आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि लक्षद्वीपजवळील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे तसेच कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. राज्यातील काही भागांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
Konkan, West Maharashtra and Marathwada Rain Forecast

Konkan, West Maharashtra and Marathwada Rain Forecast

esakal

Updated on: 

Maharashtra Rain Alert: IMD Issues Yellow Alert for 10 Districts : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असताना दुसरीकडे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज, रविवार (ता. १८ ऑक्टोबर) रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उर्वरित राज्यात मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com