Maharashtra Rain News : कोकणात पावसाचा रेड अलर्ट, राज्यातील 'या' भागांत मुसळधार, जाणून घ्या पुढील २४ तासांत कसे असेल हवामान?
Monsoon Update : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने येले अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (23 जुलै) अतिमुसळधार पाऊस कोसळत असून रेड अलर्ट जारी करण्यात तर विदर्भातही अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.