weather update rain forcast alert in  Maharashtra
weather update rain forcast alert in Maharashtraesakal

Maharashtra Rain Alert : आज राज्यात कुठे होणार पाऊस? 'या' ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

Published on

खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्यातील कोकण, पश्चिम विदर्भ आणि नाशिक भागात पावसाने जोरदार आगमन केलं आहे. पावसाची वाट पाहत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यात देखील पाऊस झाला. यामुळे काही प्रमाणात चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाने पुढील २,३ आठवडे महाराष्ट्राच्या काही भागांसह देशातील बहुतांश भागात मान्सूनची सक्रिय राहील अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ऑगस्टमधील अत्यंत कमी पाऊस झाल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील बहुप्रतिक्षित पाऊसामुळे राज्यातील पाण्याचे साठे आणि पिके सुधारतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

weather update rain forcast alert in  Maharashtra
G20 summit: G-20 परिषदेत दिल्ली जाहीरनामा मंजूर; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला यश

राज्यात आज कुठे पाऊस होणार?

राज्यातील अनेक भागात अद्यापही दमदार पावसाटी वाट पाहिली जात आहे. यादरम्यान हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागातील सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

weather update rain forcast alert in  Maharashtra
G20 Bharat Mandapam: 'भारत मंडपम' उभारणीसाठी इतिहासातून प्रेरणा; जाणून घ्या 10 खास वैशिष्ट्ये

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी बरसतील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com