मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, अजित पवारांनी राणेंना सुनावले

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, अजित पवारांनी राणेंना सुनावले
Updated on

चिपळूण दौऱ्यावर असाताना पारा चढलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. आधिकाऱ्यांवर ओरडताना राणे यांचा यांचा संयम सुटला अन् मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलले. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं असून राणेंना चांगलेच सुनावलं आहे.

राज्यात पूरस्थिती उद्भवली आहे. या संकटाच्या काळत राजकीय नेते दैौरे करत आहेत. केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षातील नेते आणि राज्यातील मंत्रीही दौरे करत आहेत. तो सर्वांचा आधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना अशा परिस्थितीत दौरे केले, पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहेत?, तहसीलदार कुठे आहेत? अशी विचारणा करत बसलो नाही. पण काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कुणीही कधीही वापरली नव्हती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलाय की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला आलात? असा सवाल अजित पवार यांनी नाव न घेता राणे यांना विचारला.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, अजित पवारांनी राणेंना सुनावले
मनसेसोबत युती होणार का?; फडणवीसांनी दिलं उत्तर

राणे काय म्हणाले होते?

चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला होता. व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन जाब विचारला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा तोल गेल्याचेही दिसले. राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, अजित पवारांनी राणेंना सुनावले
अजितदादांचं मुख्यमंत्रिपद अनेकदा हुकलं - फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

SOLAPUR sakal
solapur city crime branch action
सोलापुरात पाऊस नाही तरी भीमा नदीला पूर! चिंचपूर, बरूर, औजसह आळगे, खानापूर, हिळ्ळी बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, वाचा...
The meeting also focused on the Parli bypass, Autism Park proposal, MGNREGA works, while an unexpected power outage and a tree fall marked the event.
Marathi News Esakal
www.esakal.com