esakal | मनसेसोबत युती होणार का?; फडणवीसांनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेसोबत युती होणार का?; फडणवीसांनी दिलं उत्तर

मनसेसोबत युती होणार का?; फडणवीसांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांच्यातील युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची नाशिक येते भेट झाल्यानंतर या चर्चेला आणखीनच उधाण आलं होतं. दोन्ही पक्षातील मतभेत दूर करण्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची क्लिपही चंद्रकांत पाटील यांना पाठवत युतीच्या दिशेन पाऊल उचलल्याचं दिसले. पुढील आठवड्यात भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहे. याच पार्श्वभूमिवर मनसे-भाजप युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत फडणवीस यांना मनसेच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.

राज ठाकरे आणि आमचे संबंध चांगलेच आहेत. पूर्वी ते शिवसेनेत होते. त्यावेळी आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. आताही आमचे वयक्तिक संबध चांगलेच आहेत. मागील काही काळात माझी आणि त्यांचीही भेट झाली आहे. सध्या सुरु असलेल्या मनसे-भाजप युतीवर इतकेच सांगेल की, ज्यांची आणि आमची भूमिका पटेल, त्यांच्यासोबत जायला हरकत नाही. आज मनसेनं हिंदुत्व स्वीकारलं आहे आणि तो आम्हाला जोडणारा धागा आहे. पण त्याचवेळी आम्हाला व्यापक हिंदुत्वाची आपेक्षा आहे. भाषेच्या अथवा प्रांताच्या नावावर भेदभाव होणं, भाजपला मान्य नाही. आमचं मत आहे, महाराष्ट्रात मराठी माणसालाच प्राधान्य मिळायला हवं. त्याच्यावर अन्याय होता कामा नये. पण इतरांवर अन्याय करणं, म्हणजे मराठी माणसाला प्राधान्य देणं. हे आम्हाला मान्य नाही. म्हणून या भूमिकेत जोपर्यंत स्पष्टता येत नाही. तोपर्यंत मनसे आणि भाजप एकत्र येण्यावर बंधने आहेत, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: ठाकरे सरकार 'या' कारणामुळे पडेल, फडणवीसांची भविष्यवाणी

राज ठाकरे काय म्हणाले?

फडणवीस म्हणाले होते की, राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत भूमिका स्पष्ट केली तर आम्ही विचार करू. यावर फडणवीस यांनी उत्तर देताना माझी भूमिका स्पष्टच असल्याचं सांगत फडणवीस यांच्या वक्तव्यातली हवा काढून टाकली. तसंच भाजप मनसे युतीच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, असे प्रश्न माध्यमांकडूनच विचारले जातात आणि त्याच्या उत्तरावर चर्चा केली जाते. उत्तर भारतीयांसाठी केलेल्या भाषणाची क्लिप मी चंद्रकांत पाटील यांना पाठवलेली नाही असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: अजितदादांचं मुख्यमंत्रिपद अनेकदा हुकलं - फडणवीस

हेही वाचा: पूरग्रस्तांसोबत फडणवीस जेवले, जाणून घेतल्या व्यथा

हेही वाचा: "मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाहीत"

loading image
go to top