
पुणे : कोकणापासून मराठवाड्यापर्यंत बहुतांश भागात मंगळवारी (ता. २०) पूर्वमोसमी पावसाने जोरदार दणका दिला. पावसाचा हाच जोर बुधवारीही (ता. २१) कायम राहण्याची दाट शक्यता असल्याने कोकणासह घाटमाथ्यावर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्येही पावसाची दमदार हजेरी लागण्याची शक्यता आहे.