Rain Updates : मुंबईसह कोकणात मुसळधार; काही भागात रेड अलर्ट, प्रशासन सतर्क

maharashtra weather update
maharashtra weather updatesakal

पावसामुळे मुंबईकरांना कामाच्या ठिकाणी अडकण्याची वेळ येऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच मुख्य सचिव यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बेस्ट तसेच एसटी बसेसच्या माध्यमातून मुंबईकरांची व्यवस्था करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विभागवार अधिकारी नेमण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या अडकलेल्या मुंबईकरांची चहा नाश्त्याची व्यवस्था करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रवाशांना कोणताही त्रास होता कामा नये याच उद्देशातून सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुसळधार पावसामुळं टाणे-मुंब्रा बायपासवर दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

मुंबईच्या काही भागात पाणी साचले असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर काही लोकलच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे पण लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला नाही. मुंबईच्या कुर्ला, नेहरूनगर, वडाळा, चेंबूर या भागात पाणी साचले आहे. परंतु हिंदमाता परिसरात पाणी साचले नसल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान पावसात अडकलेल्या मुंबईकरांसाठी एसटी, बसची सुविधा देणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा अंदाज घेतला आहे. त्याचबरोबर कोकण आणि कोल्हापूरातील काही भागात NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान खात्यानं ही माहिती दिली असून पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांसह नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रसह इतर भागातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुबंईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून विविध रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. यामुळं मोठ्या प्राणावर वाहतूक कोंडी झाली असून झाली आहे. यामध्ये कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल या भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.

कुला येथुन चेंबुर येथे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुक कांडी झाली हाेती. (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)
कुला येथुन चेंबुर येथे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुक कांडी झाली हाेती. (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)
सायन येथील गुरुकृपा हाॅटेलसमाेरील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातुन वाट काढताना नागरिक. (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)
सायन येथील गुरुकृपा हाॅटेलसमाेरील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातुन वाट काढताना नागरिक. (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)
किग्ज सकल येथील गांधी माकेटमध्ये साचलेले पाणी (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)
किग्ज सकल येथील गांधी माकेटमध्ये साचलेले पाणी (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)

मुसळधार पावसामुळे कोकणात अऩेक ठिकाणी दरड कोसळण्याचा घटना समोर येत आहेत. यापैकी एक मुंबई - गोवा महामार्गावरील दाभिळ नजीक संतोष धारु चव्हाण (रा. दाभिळ) यांच्या घरावर दरड कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. दरम्यान, नातूनगर घागवाडी येथेहीदरड कोसळली आहे.

सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस इंजिन खराब

सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस इंजिन खराब झालं आहे. रत्नागिरी किंवा मडगाव वरून दुसरं इंजिन येणार आहे. नंतर पुढे ट्रेन सावंतवाडीच्या दिशेने जाणार आहे.

मुंबईच्या अंधेरी परिसरात घरांमध्ये पाणी घुसले

मुंबईच्या अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रस्त्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. अंधेरी सबवे असो की आजूबाजूचे रस्ते, सर्वत्र पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान आहे की बॅरिकेड्स आणि दुचाकी देखील पाण्यात वाहू लागल्या आहेत.

महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टीमुळं पूरस्थिती, दरेकरांची घटनास्थळी धाव

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने आज सकाळी महाड येथे धाव घेतली.अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली.

कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याची घटना घडलीय. कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाराघाट आहे. कोकणातील येणाऱ्याची वाट बिकट झालीय. कोकणाला जोडणारे दोन प्रमुख मार्गावरील घाट वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. एक परशुराम घाट आणि दुसरा कुंभार्ली घाट.

एनडीआरएफ टीम कोल्हापुरात होणार दाखल

कोल्हापूर : जिल्ह्यात मागच्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने दैना उडाली आहे. काल सकाळी सुरू झालेल्या पावसानं पंचगंगा नदी पातळीत तब्बल 8 फुटांनी वाढ झाली आहे. तर, जिल्ह्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलीय. दरम्यान, आज एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूर, मुंबई इथं तैनात करण्यात आल्या आहेत

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे येथील परिसरात भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेश मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी या गावपरिसराला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगेची तातडीने पाहणी केली.

मुंबईत पाणीच पाणी

मुंबईत पावसाचा जोर सुरुच आहे. त्यामुळे काही भागांतील रस्त्यांवर पाणी आले आहे. भाजी मार्केटमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवसा तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली आल्याने संपर्क तुटला आहे. तिवसा शहरातील पिंगळाई नदीला पूर आल्याने येथील भाजी मंडईत पाणी भरल्याने नागरिक अडकले होते. जिल्हा बचाव पथकाच्या मदतीने या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांना ट्रेन अलर्ट देण्यात आला आहे. परेल टीटीसह सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु झाल्या आहेत. मेन लाईन, हार्बर मार्गावर काही गाड्या विलंबाने धावत आहेत.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदीदेखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) तुकड्या कोकण आणि विदर्भात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याने कोकणात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण हाय अलर्टवर आहे. सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर स्थितीतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांसह कोकणातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दिले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशाराही दिला असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सायंकाळपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह कोकणातही कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आलाय. राजापूर, खेड, चिपळूण या भागांतही जोरदार पावसाची बॅटिंग सुरुय. सद्यस्थितीत पाऊस सुरुच असून पाऊस असाच सुरु राहिला, तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोकणातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यात पावसाचा जोर वाढला असल्यानं काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com