
Rain Update: विदर्भात 'यलो' अलर्ट तर राज्याच्या इतर भागात 'ऑरेंज अलर्ट'
राज्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडुन दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरू आहे. राज्यात, मुंबईसह, पुणे, पालघर, कोकणा, विदर्भात देखील पावसाची रिपरिप चालु आहे. मध्यरात्री मुंबईत पावसाने हजेरी लावली. तर काल पुण्यात दिवसभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई परिसरात देखील जोरदार पाऊस झाला.
तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर, आजही राज्याभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर, आज पालघर आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन हवामान विभागाकडुन करण्यात आले आहे. काल दिवसभरीत राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली.