मान्सूनने महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर जवळपास तीन आठवडे विश्रांती घेतली होती. आता तीन आठवड्यानंतर मान्सून पुढे सरकला असून संपूर्ण राज्य व्यापलं आहे. विदर्भाच्या उर्वरित भागातही मान्सून दाखल झाला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून पुढे सरकला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. तर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.