
Rain Update: आज मुंबईसह रायगड, पालघर पुण्यात ऑरेंज अलर्ट
गेल्या काही दिवसात हवामान विभागाकडुन देण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. रात्रीपासून मुंबई उपनगरासह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस चालु आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविण्यात आली आहे. तसेच नाशिक, नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.