Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर राज्यातील 'या' भागांत आज हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज जारी

Monsoon Forecast : उर्वरित भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा व चक्राकार वाऱ्यांमुळे पावसावर परिणाम होत आहे. पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Dark clouds over the Western Ghats  

Dark clouds over the Western Ghats  

esakal

Updated on

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा जोर आज (ता. २० जुलै) कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com