
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात मान्सूनने आगमन केलं. यंदा मान्सूनच्या आगमनासोबतच पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. मान्सून दाखल झाल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला. यामुळे पाऊस ओसरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या २४ तासात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर राज्यातील उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.