

IMD weather forecast Maharashtra rain alert
esakal
Bay Of Bengal Rain : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशभरातील हवामानात बदल जाणवत आहे. याबाबत, भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, आज (ता. ३०) किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.