esakal | राज्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या २४ टक्के जास्त पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

राज्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या २४ टक्के जास्त पावसाची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सूनच्या (Monsoon) हंगामात यंदा राज्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या तुलनेत २४ टक्के जास्त पावसाची नोंद (Rain Registration) झाली आहे. तर राज्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत सरासरी ५३८.५ मिलिमीटर ऐवजी ६६९.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने दमदार एंट्री केली होती. कोकण आणि घाट विभागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. धरणे ही ‘ओव्हर फ्लो’ झाली, तर कोल्हापूर, सातारा, कोकणात पूरपरिस्थिती ही पाहायला मिळाली.

राज्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर, कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सध्या दक्षिण उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते पुढील ४८ तासांमध्ये पश्‍चिम उत्तर प्रदेशच्या दिशेने विस्थापित करेल. तर दक्षिण हरियाना व परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा या दोन्ही कमी दाब क्षेत्रांमधून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा: "बरोबर ना राऊतसाहेब?"; 'त्या' ट्वीटवरून राणेंचा शिवसेनेला खोचक टोला

पुढील चार दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ही कमी होणार आहे. मात्र मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पाऊस ओसरणार आहे.

पाऊस सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद -

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची १ जून ते ३१ जूलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. परंतु मध्य महाराष्ट्राच्या नंदूरबार आणि धुळे येथे पावसाची ओढ होती. धुळे येथे सरासरीपेक्षा २३ टक्के तर, नंदूरबार येथे सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या उलट सातारा आणि परभणीने बाजी मारली आहे. साताऱ्यात सरासरीपेक्षा ७० तर परभणीत सरासरीपेक्षा ७१ टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे.

राज्यातील पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये (पाऊस १ जून ते ३१ जुलैपर्यंत)

भाग पडलेला पाऊस (मिमी) सरासरी पाऊस (मिमी) टक्केवारी

मध्य महाराष्ट्र ५००.४ ३९७.८ २६

विदर्भ ४९७.३ ४७७.७ ४

मराठवाडा ४२३.७ ३१७.१ ३४

कोकण २४०२.७ १७५७.८ ३७

loading image
go to top