महाराष्ट्राला दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना
कोरोना सकाळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 25,425 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर, 36,708 जण कोरोनामुक्त (Maharashtra Active Corona Cases) झाले आहेत. तर, गेल्या 24 तासांत 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोेंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2,87,397 इतके सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra New Covid Cases News In Marathi)

सध्या राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर 94.32 टक्के इतका नोंदविला गेला असून, 1,53,1108 इतके रूग्ण होम क्वारंटाइन (Home Isolation) आहेत तर, 3,259 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईन (Quarantine Center) आहेत. आज राज्यामध्ये 72 नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली असून, यामध्ये पुण्यात 33, औरंगाबादमध्ये 19, मुंबई (Omicron Cases In Maharashtra) आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 2, ठाणे - 3, यवतमाळ आणि अहमदनगर येथे प्रत्येकी 1 तर नागपूर, पुणे ग्रामीण आणि लातूर येथे प्रत्येकी एका ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण होणाऱ्यांची राज्यातील संख्या 2,930 इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी 1,592 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

कोरोना
देशातील पॉझिटिव्हिटी रेट 17.75 टक्क्यांवर : आरोग्य मंत्रालय

मुंबईत गेल्या 24 तासांत 1,384 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर, 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका नोंदविला गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 40 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 हजार 581 इतकी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com