
पुणे - राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आला आहेत. त्यात पुणे विभागातील तेरा उपजिल्हाधिकारी आणि दहा तहसीलदारांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या महसूल विभागाचे सचिव माधव वीर यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार भूसंपादन अधिकारी-२ सातारच्या संगिता राजापूरकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन क्रमांक -३ येथे बदली करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. वनश्री लाभशेटवार यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन - ६ येथे बदली झाली आहे. फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांची सातारा भूसंपादन क्र. २ येथे बदली करण्यात आली. विजय देशमुख हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना उपविभागीय अधिकारी कडेगाव येथे बदली करण्यात आली.
वाळवाचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांची उपजिल्हाधिकारी (महसूल) कोल्हापूर येथे बदली झाली आहे. सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची रायगड जिल्हा पुनर्वसन अधिकारी. कोरेगावचे उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची उप जिल्हाधिकारी (रोहयो) रायगड येथे बदली करण्यात आली. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ३ सुभाष बागडे यांची पलघरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. पुणे भूसंपादन क्र. १ चे प्रवीण साळुंखे यांची नंदूरबार उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची उपजिल्हाधिकारी (सामान्य) उस्मानाबाद येथे तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले शैलेश सूर्यवंशी यांची बीड येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य) येथे बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची फलटण उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
तहसीलदार बदल्या
तहसीलदारांमध्ये उज्वला सोरटे यांची राज्य शेती महामंडळ फलटण येथून दक्षिण सोलापूर तहसीलदार या रिक्त पदावर बदली करण्यात आली. सोनाली मेटकरी या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना तहसीलदार वाई येथे पदस्थापना देण्यात आली. मिनल भामरे यांना तहसीलदार (रजा राखीव) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पदस्थापना देण्यात आली. अनिलकुमार होळकर यांची शिरोळ तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली.
लैला शेख यांची तहसीलदार पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बदली करण्यात आली.अजित पाटील यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदाची जबाबदारी देण्यात आली. माधवी शिंदे यांची तहसीलदार पन्हाळा येथे बदली करण्यात आली. अमरदीप वाकडे यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार तर अर्चना कापसे यांना तहसीलदार कवठे महाकाळ येथे पदस्थापना देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.